सातोली बावळट तीठा येथे पावणे दोन लाखाची दारू जप्त

चालक ताब्यात; जिल्हा वाहतूक शाखेची कारवाई;

⚡सावंतवाडी ता.०८-: सातोळी बावळट तिठा येथे जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १ लाख ७२ हजार ८०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत टेम्पो चालक विठ्ठल आशियेकर रा. गोवा आरोपी याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस फौजदार अजित घाडी, पोलीस हवालदार दळवी, पोलीस हवालदार सापळे, पोलीस नाईक मयूर सावंत आदींनी कारवाई केली.

You cannot copy content of this page