⚡कणकवली ता.०७-: वाघेरी गावचे सुपुत्र तथा मुंबईत मागाठणे डेपोमधून सेवा देणारे उदय जयराम राणे यांचा उत्कृष्ट बस चालक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गेली १० वर्षे विनाआपघात सेवा देणारे चालक म्हणून उदय राणे यांना हा पुरस्कार देण्यात आला. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमांतर्गत रविवारी ७ ऑगस्टला बेस्टदिनी स्मृतिचिन्ह व पदक देऊन राणे यांना सन्मानित करण्यात आले. उपस्थित अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
