हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना आ नितेश राणे यांची मानवंदना

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनी आयोजित स्मृतीजागर कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहून मानवंदना दिली. सडूरे येथील श्री रवळनाथ मंदिरात आयोजित कार्यक्रमात आमदार नितेश राणे यांनी कौस्तुभ राणे यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात कौस्तुभ रावराणे यांच्या घरी प्रतिमा पूजनाने करण्यात आली. घर ते रवळनाथ मंदिर अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रामस्थ व राणे प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यावेळी मंदिरात माध्यमिक व प्राथमिक शाळांचे समूहगीत सादर करण्यात आले. त्याचबरोबर हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या बद्दल माहिती देण्यात आली. तसेच कोल्हापूर येथील शाहीर राजू राऊत यांनी शायरी पोवाडा सादर केला. यावेळी सर्व पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित हो

You cannot copy content of this page