हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचा चौथ स्मृती जागर संपन्न

सडूरे गावात शेकडो नागरिक, माजी सैनिकांची उपस्थिती

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनी अभिवादन व मानवंदना देण्यासाठी सडुरे गावात नगरीकांनी मोठी गर्दी केली. आयोजित करण्यात आलेला स्मृतीजागर कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पडला. या स्मृती जागरात शेकडो नगरीक व माजी सैनिक सहभागी झाले होते. भारत माता की.. जय, वंदे मातरम, अमर रहे.. अमर रहे.. कौस्तुभ राणे अमर रहे, अशा घोषणांनी खोरीतील सडुरे गाव दणाणून सोडला. कार्यक्रमाची सुरुवात मेजर कौस्तुभ राणे यांच्या सडूरे येथील घरी प्रतिमा पुजनाने करण्यात आली. कौस्तुभ राणे यांच्या आजी, चुलते व पोलीस अधिकारी यानी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली.

कौस्तुभ राणे यांचे घर ते श्री रवळनाथ मंदिर अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत सडूरे, अरुळे गावातील माध्यमिक व प्रथमिक शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. ग्रामपंचायत पटांगणावर आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीं परेड ने मेजर कौस्तुभ राणे यांना मानवंदना दिली. श्री देव रवळनाथ मंदिरात विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वि.मं.करुळ गावठण अ, नाधवडे ब्राम्हणदव प्रशाला, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, सडुरे अरुळे विद्यालय येथील मुलांनी देशभक्तीपर समुहगीत सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रा. शिरसाट यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या जीवनपटावर उपस्थितांना माहिती दिले. सडूरे ग्रामपंचायत मधील कौस्तुभ रावराणे सभागृहाचे उद्घाटन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापुर येथील शाहीर राजू राऊत यांनी शाहीरी पोवाडा सादर करत देश सेवा करत हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रध्दांजली वाहीली. यावेळी मंदिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page