मालवणात १५ वर्षाखालील मुलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा

⚡मालवण ता.०७-: मालवण येथील भरड दत्तराज मित्रमंडळ तर्फे मयुरेश मालंडकर स्मृती निमित्त १५ वर्षांखालील मुलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता भरड येथे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक रु. २२२२, चषक व चांदीचा नारळ तर द्वितीय क्रमांक रु.११११ व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेमध्ये प्रथम ३२ स्पर्धकांना सहभाग दिला जाईल. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आधार कार्ड घेऊन येणे अनिवार्य आहे. सहभागी स्पर्धकांना मित्रमंडळातर्फे नारळ पुरविण्यात येतील. नावनोंदणी साठी करण खडपे ९८६७१७४७९९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page