⚡मालवण ता.०७-: मसुरे बाजारपेठ येथील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते देविदास भास्कर शिरसाट वय ५७ वर्ष यांचे शनिवारी संध्याकाळी उशिरा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.
देविदास शिरसाट यांचे गावातील सामाजिक, धार्मिक, कला, क्रीडा, क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान होते रविवारी सकाळी मसुरे येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्याच्या पाश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय,आई, बहीण, भाओजी, पुतणे, पुतणी, भाचे,भाची, नातवंडे असा मोठा परिवार आहे मसुरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य निळकंठ शिरसाट,तसेच प्रतिष्ठित व्यापारी भाऊ शिरसाट, आपा शिरसाट यांचे ते बंधू तर कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते संजय अंधारी यांचे ते मेहुणे होतं.
