वैभववाडी संजय शेळके
वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने शहरातील सुलभ शौचालय इमारततीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या सुसज्ज सुलभ शौचालयाचे उद्घाटन नगराध्यक्षा नेहा माईणकर व नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्राची तावडे, माजी सभापती स्नेहलता चोरगे, माजी सभापती शारदा कांबळे, न.पं. समिती सभापती विवेक रावराणे, माजी सभापती शुभांगी पवार, व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, नगरसेवक रोहन रावराणे, नगरसेविका संगीता चव्हाण, यामिनी वळवी, रेवा बावदाने, सुंदरी निकम, नगरसेवक राजन तांबे, रामचंद्र बावदाने व नगरपंचायतचे कर्मचारी, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वार्ड क्रमांक ५ मध्ये हे सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे. संपूर्ण सुलभ शौचालयाची डागडुजी करण्यात आली आहे. तसेच मुबलक पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
फोटो – वैभववाडी शहरातील सुलभ शौचालयाचे उद्घाटन करताना नगराध्यक्षा नेहा माईणकर. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी व न.पं. पदाधिकारी छाया संजय शेळके वैभववाडी
