सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट चे संयुक्त आयोजन
वैभववाडी प्रतिनिधी
शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतीदिनानिमित सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी व राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आर्म फोर्स मेडिकल कॉलेज(AFMC) पुणे येथे वैभवावाडी मधील रक्तदाते रक्तदान करणार आहेत. सैनिकांसाठी रक्तदान करण्याचा हा अनोखा प्रयोग करण्यात येणार आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी तालुकाध्यक्ष श्री राजेशजी पडवळ यांच्या संकल्पनेतुन एक रक्तदान शिबीर सैनिकांसाठी करण्यात येणार आहे. Armed Forces Medical College रक्तपेढी, पुणे यांनी राजेश पडवळ यांच्या संकल्पनेचे स्वागत करत रक्तदान करण्यास परवानगी दिली आहे.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होणार आहे. रक्तदान करण्यासाठी २० रक्तदात्यांची टीम वैभववाडी येथून पुणे येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी रवाना होईल. सोमवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. सर्व रक्तदाते पुणे येथील आर्मीच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करणार आहेत. अशी माहिती राजेश पडवळ यांनी दिली आहे.
