कोकिसरे ग्रामपंचायतिच्या उपसरपंच पदी भाजपच्या लक्ष्मी म्हेतर यांची बिनविरोध निवड…

वैभववाडी संजय शेळके
कोकिसरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाच्या लक्ष्मी दिलीप म्हेतर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी त्यांचे अभिनंदन केले.


निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी पार पडली. उपसरपंच वसुधा आमरसकर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. प्रत्येकाला संधी या पक्षीय धोरणानुसार या निवडी करण्यात आल्या आहेत. निवडप्रसंगी कोकिसरे सरपंच अवधूत नारकर, माजी सरपंच दत्ताराम सावंत, माजी सरपंच प्रकाश पांचाळ, ग्रा. पं. सदस्य प्रदीप नारकर, प्रमोद यादव व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड झाल्यानंतर लक्ष्मी म्हेतर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संभाजी वाघमोडे यांनी काम पाहिले.
फोटो – कोकिसरे उपसरपंचपदी लक्ष्मी म्हेतर यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना सरपंच अवधूत नारकर व सदस्य छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page