क्षत्रिय मराठा घडीगांवकर सेवा समाज मुंबई बोरिवली विभाग अध्यक्षपदी प्रफुल्ल घाडी यांची निवड…

वैभववाडी संजय शेळके
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई बोरीवली विभाग च्या अध्यक्षपदी प्रफुल्ल महादेव घाडी यांची निवड करण्यात आली आहे.


मालाड – दिंडोशी ते विरार कार्यक्षेत्र आयोजित विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधी करीता नविन कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडली. निवडणूक निरीक्षक म्हणून श्री. विजय घाडीगांवकर यांनी काम पाहिले. व मार्गदर्शन केले. बोरीवली विभाग नविन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष प्रफुल्ल महादेव घाडी रा. नाधवडे ता. वैभववाडी, उपाध्यक्ष – अशोक भिकाजी घाडीगांवकर रा. पियाळी, सचिव – सतीश नामदेव घाडीगांवकर रा. कुवळे, सहसचिव – महेश सहदेव घाडीगांवकर रा. पियाळी खजिनदार – भिकाजी आत्माराम गांवकर चाफेड, महिला सदस्य – सुहासिनी सु .घाडी, सौ. ज्योती चिंतामणी घाडी, सदस्य – सत्यवान हरी पवार, सदस्य – नंदकुमार विष्णु घाडीगांवकर, जगदीश भ. घाडी, सचिन ज. घाडी, संतोष ना. घाडीगांवकर, लतिकेश सं. घाडी, शंकर म. घाडी, निखिल ज. गांवकर, बोरीवली विभाग माजी अध्यक्ष गजानन घाडीगांवकर यांची बोरीवली विभागाच्या वतीने मध्यवर्ती कार्यकारिणी मंडळात समावेश करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. मध्यवर्ती संस्थेचे माजी अध्यक्ष अनंत धोंडु घाडी यांनी उपस्थित राहुन मोलाचे मार्गदर्शन केले.
फोटो – प्रफुल्ल घाडी

You cannot copy content of this page