कणकवली पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद

विनोद कांबळे ;तत्परतेने गुन्ह्याचा उलगडा लावल्याबद्दल केला सत्कार

⚡कणकवली ता.०६-: कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात जुलै २०२२ मध्ये दाखल झालेले गुन्हे व आकस्मात मृत्यू प्रकरणांचा तपास दैनंदिन ड्युटी व बंदोबस्त सांभाळून तपास तत्परतेने पूर्ण करत प्रकरणांची निर्गती करण्यात आली.त्याबद्दल पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन ५ ऑगस्ट कणकवली पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी
पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन कौतुकाची थाप देत सत्कार केला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे म्हणाले,कणकवली पोलीस ठाण्यात कमी कर्मचारी असताना देखील काम सांभाळत गुन्ह्यांचा उलगडा करणे कठीण होऊन जाते.पण पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी एक अनोखी संकल्पना राबवून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हाताला बळ दिले आहे. त्यामुळे हा उपक्रम खूप स्तुत्य आहे.कणकवली पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. यावेळी तत्परतेने गुन्ह्याचा उलगडा करणारे पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे, पोलीस हवालदार,उत्तम वंजारे, पोलीस हवालदार रवींद्र बाईत, पोलीस हवालदार सिताराम सावंत, पोलीस हवालदार मिलिंद देसाई, पोलीस नाईक रुपेश गुरव, पोलीस नाईक मनोज गुरव पोलीस नाईक पांडुरंग पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, पोलीस नाईक विनोद चव्हाण, पोलीस नाईक घाडीगावकर, पोलीस कॉन्स्टेबल जांभळे महिला पोलीस नाईक नीलम पवार यांचा सत्कार करत गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page