देवगड ता.०६-:
देवगड किल्ला येथील श्री हनुमान मंदिरात सप्तप्रहरांचा श्री हरिनाम सप्ताहास शनिवारी स.१० वाजले पासून उत्साहात सुरुवात झाली .विधिवत घटस्थापना उद्योगपती नंदकुमार घाटे व अन्य मानकरी,देवगड किल्ला उत्कर्ष मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आली.त्यानंतर स्थानिक भजन मंडळे, महिला भजन मंडळे यांनी बहारदार हरिनामाचा गजर केला संपूर्ण दिवसरात्र सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात रात्रौ दिंडी चित्ररथ साकारण्यात येऊन रविवारी दुपारी दहीहंडीने या सप्ताहाची सांगता होणार आहे.
हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहात प्रारंभ
