बेशिस्त वाहन चालकांकडून जुलैमध्ये लाखाच्यावर दंड वसूल

१७४ जणांना बसला दणका

⚡मालवण ता.०६-: जुलै महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणातील १७४ वाहनचालकांवर १ लाख १३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

मालवण शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली असणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी उभी करणे, हेल्मेट नसणे, आरसी बूक, पीयूसी नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण भरड नाका व बाजारपेठ येथे वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब, अमित हरमलकर यांनी ही दंडात्मक कारवाई केली.

You cannot copy content of this page