स का पाटील महाविद्यालयात एनसीसी भरती पूर्ण

जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रतिसाद

⚡मालवण ता.०६-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये एनसीसी भरती ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदूर्ग यांच्याकडून पूर्ण करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच बाहेरील जिल्ह्यातील सुद्धा विद्यार्थी एनसीसी प्रवेशासाठी उपस्थित राहिल्याने या भरतीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अलीकडच्या काळात आर्मी भरती ,पोलीस भरती, प्यारा मिलिटरी, तटरक्षक दल, खाजगी कंपन्या, सार्वजनिक कंपन्या अशा अनेक ठिकाणी एनसीसी कॅडेट्स ना प्राधान्य दिले जात असल्यामुळे एनसीसी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची रेलचेल होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसी भरती घेण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग बटालियनचे आर्मी ऑफिसर अनिल कुमार (राजस्थान) व भजनसिंग (जम्मू काश्मीर) हे भरती करण्यासाठी हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांची छाती ,उंची , सीट अप, पुष अप, रनिंग, तोंडी परीक्षा, इत्यादी निकष पूर्ण करण्यात आले. ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत व एनसीसी सिनियर्स तेजस पोळ, नारायण मुंबरकर, निखिल मोरवेकर, प्रीती बांदल, तृप्ती माडिये, अक्षता केरकर पूर्वा कोयंडे यांनी नियोजन केले.

कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर उज्वला सामंत यांनी आर्मी ऑफिसर यांचे पुष्प देऊन स्वागत करत एनसीसी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका गर्ल्स केअर टेकर मीनल सामंत यांनी आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page