ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांना पाठविल्या राख्या

⚡मालवण ता.०६-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर स्वतः राख्या तयार करून भारतीय सैनिकांना पाठविल्या आहेत.

ज्यांच्या अभूतपूर्व त्याग व बलिदानामुळे आपण व आपले राष्ट्र सुरक्षित आहे, अशा शूरवीर भारतीय सैनिकांबद्दल समाजामध्ये आदर निर्माण व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ व्हावी यादृष्टीने शाळेने यापूर्वीही हा उपक्रम राबविला आहे. शाळेमार्फत सैन्याधिकारी यांना राख्यांसोबत पाठविलेल्या पत्रात भारतीय सैनिकांबदल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. हा उपक्रम राबविण्यासाठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रवीण पारकर यांनी मेहनत घेतली. या उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक पी.आर. खोत यांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.

You cannot copy content of this page