तक्रार करूनही वीज वितरण अधिकारी करतायत दुर्लक्ष;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा आरोप
⚡सावंतवाडी ता.०६-: शहरातील भटवाडी परिसरातील स्ट्रीट लाईट गेले दोन महिने रात्री नऊ वाजता बंद होत असून, ती सकाळ पर्यंत येत नसल्याने त्याचा नाहक त्रास तेथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील विज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी आज विज वितरणचे उपअधीक्षक श्री. भुरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना दोन दिवसाची मुदत दिली असून, दोन दिवसांत या समस्यांवर योग्य उपाययोजना न केल्यास भटवाडीतील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
