ओरोस ता.०६-:
जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या “स्वराज महोत्सव” अंतर्गत केंद्रस्तरीय स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. तब्बल २४ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक मिळविला आहे.
या विद्यार्थ्यांना शिक्षक संजय पेंडुरकर, समीर चांदरकर, रितेश जांभवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर व संस्था पदाधिकारी व संचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
वक्तृत्व स्पर्धेतील पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक ध्रुवी भाट, द्वितीय क्रमांक कृतिका लोहार, तृतीय क्रमांक हर्षिता कानूरकर, आठवी ते दहावी गटात पूर्वा चांदरकर प्रथम क्रमांक, भक्ती बेलूसे द्वितीय क्रमांक, गट अकरावी बारावीमध्ये ऐश्वर्या परब द्वितीय क्रमांक, सानिका मेस्त्री तृतीय क्रमांक असे यश मिळविले.निबंध स्पर्धेतील गट पाचवी ते सातवीमध्ये प्रथम क्रमांक भाविका गुराम, द्वितीय क्रमांक तनवी गोंधळी, तृतीय क्रमांक आर्या फोपळे, आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक सई ताम्हणकर तर गट अकरावी बारावीमध्ये प्रथम क्रमांक मानसी परब, द्वितीय क्रमांक मानसी गिरकर, तृतीय क्रमांक श्रुती कदम, असे यश मिळविले आहे.
चित्रकला स्पर्धेत गट पाचवी ते सातवीमध्ये
रुद्राक्ष मेस्त्री प्रथम क्रमांक, स्वराली ताम्हणकर द्वितीय क्रमांक, माऊली थवी तृतीय क्रमांक, गट आठवी ते दहावीमध्ये ममता अंगचेकर प्रथम क्रमांक, श्रेया चांदरकर द्वितीय क्रमांक, रिया भगत तृतीय क्रमांक तर अकरावी बारावी या गटातून रश्मी पांचाळ प्रथम क्रमांक, सोनिया हाडये द्वितीय क्रमांक, साक्षी मंगेश मयेकर तृतीय क्रमांक असे यश प्राप्त केले आहे.
