जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील
ओरोस ता.०६-:
कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघटीत पणे प्रयत्न केले पाहिजेत. संघटनेत युनिटि व टिमवर्क महत्वाचे आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांनी व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवार ५ ऑगस्ट, २०२२ रोजी सिंधुदुर्गनगरी येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव होते. व्यासपीठावर सेवानिवृत्त लिपिक पी. के. चौकेकर, सायमन फर्नांडिस, बाबुराव आरोलकर उपस्थित होते. यावेळी मिलिंद जाधव यांनी संघटनेतील सभासदांच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त करुन संघटनेच्या वाटचालीबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी पी के चौकेकर, लिपिक, टोपीवाला हायस्कूल मालवण, सायमन फर्नांडिस , एस एम एस स्कूल कणकवली, बाबुराव आरोलकर चतुर्थ श्रेणी कर्मचारी, शिरोडा हायस्कूल यांचा संघटनेच्यावतीने तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालयाकडून श्री.पाटील , लिपिक श्री. सावंत यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. लिपिक हा संस्थेचा कणा आहे. तसेच प्रशासकीय कामातील महत्वाचा दुवा आहे. म्हणून लिपिकांनी नेहमी अपडेट रहावे. सेवानिवृत्ती नंतरही संघटनेच्या कार्यात सहकार्य करु अशी ग्वाही सत्काराप्रती भावना व्यक्त करताना पी.के. चौकेकर यांनी दिली. यावेळी अनिल करगुटकर, श्री. डिसोझा सर, श्री. रमेश जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिव भानुदास परष यांनी केले. संघटनेचे सदस्य सौ.शिंत्रे, सौ. पालव, सौ. लंगडे, सौ. मणचेकर, सौ. वेंगुर्लेकर , श्री. चव्हाण,श्री. पालयेकर, श्री. कदम श्री. मोर्जे श्री. सातार्डेकर आदि उपस्थित होते.
