माजी नगराध्यक्ष संजू परब, पो नि शंकर कोरे यांच्याहस्ते लोकार्पण
सावंतवाडी ता.०६-: जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ, जिल्हा सेवा समिती-सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सावंतवाडीत मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज नगराध्यक्ष संजू परब सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे, आरटीओ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
