विजघर दोडामार्ग एसटी सुरू करा

प्रवीण गवस यांची मागणी;एसटी अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

दोडामार्ग ता.०५-: विजघर दोडामार्ग ही एस टी बस फेरी बंद असल्याने शाळा व काॅलेजचे विद्यार्थी वेळेत शाळेत पोचू न शकल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून लवकरात लवकर एस टी बस फेरी सुरू करण्याची मागणी केली जात होती मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या ९ ऑगस्ट पर्यंत एस टी बस फेरी सुरू न झाल्यास १० ऑगस्ट पासून पालक व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी एस टी महामंडळ जबाबदार राहिलं असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रविण गवस यांच्याकडून सांगण्यात आले.

You cannot copy content of this page