मालवण (प्रतिनिधी)
वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा एक डंपर कोळंब येथे मालवण महसूल विभागाच्या पथकाने पकडला. हा डंपर मालवण तहसील कार्यालयाच्या परिसरात आणण्यात आला आहे.
मालवण तालुक्यात गेले काही दिवस विनापरवाना अनधिकृत वाळू वाहतूक सुरू आहे. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात आज कोळंब येथे विनापरवाना वाळू वाहतुकीचा डंपर (क्रमांक एम. एच. ३१ इ. एन. ०७०९) महसूलच्या पथकाने पकडला. डंपर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आला आहे. आचरा मंडळ अधिकारी अजय परब, भटवाडी तलाठी योगेश माळी, चिंदर तलाठी संतोष जाधव, आचरा तलाठी अनिल काळे, माळगाव तलाठी ए. के. देसाई, हडी तलाठी प्रीतम भोगटे, रेवंडी तलाठी यु. एन. पाटील, पोलीस कर्मचारी श्री. सरकुंडे, श्री. आचरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
