⚡बांदा ता.०५-: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 2 पाडलोस मधील सर्व विद्यार्थ्यांना मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक व पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल यांच्यातर्फे वह्या वाटप करण्यात आले.
या वेळी पाडलोस सिंधू दुग्ध संस्था चेअरमन अर्जुन कुबल, पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, ग्रामस्थ श्रीधर परब, अमोल नाईक, संजय नाईक, मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर, शिक्षक गोविंद शेर्लेकर, अंगणवाडी सेविका अश्विनी साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गोविंद शेर्लेकर यांनी केले.
