स्वच्छता, चेंजिंग रूम याचा अभाव;सुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी
सावंतवाडी ता.०५-:शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील महिला प्रसूतीगृहात विविध समस्येच्या गर्तेत सापडले असून, रुग्णालयातील स्वच्छतागृह अस्वच्छ असून उपचार घेणाऱ्या महिलांसाठी चेंजिंग रुम सुद्धा उपलब्ध नाहीत. या सर्व समस्या तात्काळ सोडविण्यात यावेत अशी मागणी सावंतवाडीतील नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाला घेराव घालून करण्यात आली आहे.
