⚡ओरोस ता.०५-: येथील उत्पादन शुल्क अधीक्षक डाॕ. बी. एच. तडवी यांची उत्पादन शुल्क विभागीय अधीक्षक पदावर पदोन्नती झाली.
तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या निवृत्तीनंतर कोल्हापूर विभागीय आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सध्या डाॕ तडवी यांच्याकडे आहे. कालच त्यांची विभागीय आयुक्त पदावर पदोन्नती झाल्याने विटा निरीक्षक विजय ओमनाळे, दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे, सिंधुदुर्ग चे निरीक्षक अमित पाडळकर,निरीक्षक संजय दळवी, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, राहूल मोरे, विशाल सरवटे यांनी पुष्पगुच्छ देवून तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ‘लोकराज्य’ देवून डाॕ. तडवी यांचे अभिनंदन करण्यात आले.
