सिंधुदुर्ग सहकारी मुंबई बँकेची लवकरच सिंधुदुर्गात शाखा

नूतन अध्यक्ष म्हणून हरिष परब यांची निवड;संचालक श्रीकृष्ण ऊर्फ दीपक परब यांची माहिती

मालवण (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबई या बँकेच्या २०२२- २३ ते २०२६- २७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी हरिष बाळकृष्ण परब (देवगड) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत कार्यरत असणाऱ्या या बँकेची शाखा लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती या बँकेचे नवनिर्वाचित संचालक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबई या बँकेच्या लालबाग आणि बदलापूर अशा दोन शाखा आहेत. या बँकेच्या २०२२- २३ ते २०२६- २७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन बिनविरोध निवडी करण्यात आल्या. यामध्ये अध्यक्ष – हरिष बाळकृष्ण परब (देवगड), उपाध्यक्ष – जयवंत श्रीधर नरसाळे (देवगड), संचालक – दिवाकर रामचंद्र दळवी (सावंतवाडी), दिनकर हिरोजी तावडे (देवगड), तज्ज्ञ संचालक – शरदचंद्र सदानंद देसाई (सावंतवाडी), संचालक – विलास जनार्दन परब (कुडाळ), श्रीकृष्ण दत्ताराम परब (मालवण), चंद्रप्रकाश भैरूलाल जैन (मुंबई), संभाजी शिवाजी मंडले (सांगली), विजय बुधाजी नाईक (देवगड), स्वप्नीक सुभाष फाटक (देवगड), संचालिका- श्रीमती प्रतीक्षा प्रमोद परब (कणकवली), सौ. पल्लवी अक्षय पंडित (मुंबई), तज्ञ संचालक (स्वीकृत)- मोहन भास्कर तळेकर (देवगड), मुख्य कार्यकारी अधिकारी – अनिल वसंत प्रभुदेसाई (मुंबई), सरव्यवस्थापक – सीताराम धुराजी धुरी (कुडाळ) यांची निवड करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकमेव बँक आर्थिक राजधानी मुंबई मध्ये भक्कमपणे पाय रोवून उभी आहे. बँकेला शिखरावर नेण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. या बँकेची शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस असून त्यादृष्टीने पाठपुरावा करण्यात येईल असे नूतन संचालक श्रीकृष्ण परब यांनी सांगितले.

You cannot copy content of this page