दत्तमंदिर भरड मित्रमंडळाचे आयोजन
मालवण (प्रतिनिधी)
मालवण येथील दत्त मंदिर भरड मित्रमंडळ यांच्या वतीने दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता दत्त मंदिर भरड येथे सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. पहिल्या ३३ स्पर्धकांना स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यास रु ५,५५५ चषक व उपविजेत्यास रु. ३,३३३ चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे ६ ऑगस्ट पर्यंत करण खडपे ९८६७१७७४७९ यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
