रोटरी क्लबचे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजन
मालवण (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवणतर्फे १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे शालेयस्तरीय समरगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्राथमिक (पहिली ते चौथी) व माध्यमिक (पाचवी ते दहावी) अशा दोन गटात होणार आहे.
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघास चषक प्रदान करण्यात येणार आहे. प्राथमिक गटास अनुक्रमे १०००, ७००, ५०० रुपये, तर माध्यमिक गटास १५००, १०००, ७०० रुपये, तर सर्वोत्कृष्ट वादकास १००१ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येतील. स्पर्धकांनी ८ ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी लिमये हॉस्पिटल-०२३६५-२५२२६६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
