शिक्षकांचा पगार ऑगस्टमध्ये जमा करावा

जिल्हा मध्यामिक अध्यापक संचाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन

मालवण : (प्रतिनिधी)

गणेश चतुर्थीपूर्वी ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचा पगार खात्यात जमा करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, सचिव विजय मयेकर, राज्य सहसचिव लक्ष्मण पावसकर, राजेंद्र परब, तुकाराम पेडणेकर, सुधाकर आडेलकर यांच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांना मागणीचे निवेदन दिले. ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असल्याने गणेश चतुर्थीपूर्वी करण्यात येणारी तयारी, खरेदी यासाठी आठ दिवस पगार लवकर होणे आवश्यक आहे. २३ ऑगस्टपर्यंत पगार खात्यात जमा करून शिक्षणाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या पदाधिकान्यांनी केली आहे.

तसेच या निवेदनामध्ये थकित, प्रलंबित, मेडिकल, रजा रोखिकरण अशा प्रकारची बिले, भविष्य निर्वाह निधी, निवृत्त कर्मचारी सातवा वेतन आयोग दुसरा हप्ता, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी ही प्रलंबित कामे प्राधान्याने लवकर सोडवावीत, अशी मागणी अजय शिंदे, विजय मयेकर यांनी केली आहेत.

You cannot copy content of this page