मळगाव येथे आशिर्वाद गुरूमाऊलीचा कार्यक्रम संपन्न

विद्यार्थ्यांच्या पखवाज सोलोवादन व नादमृदुंगाने आवाजाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध

⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ-: मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालयामध्ये जगदंब संगीत विद्यालयाचे संचालक तबला /पखवाज विशारद कु. रूपेश पोवार यांच्या विद्यालयाचा “आशिर्वाद गुरूमाऊलीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांर्गत विद्यार्थ्यांचे पखवाज सोलोवादन व नादमृदुंग कार्यक्रम झाले. नादमृदुंगाच्या आवाजाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाची सुरूवात गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, पखवाज, हार्मोनियम यांच पुजन संगीत परिक्षक शहजान शेख सर, रवी गोसावी सर, रूपेश पोवार आणि सुधिर राऊळ यांच्या हस्ते करून करण्यात आली.

कु. भिकाजी कृष्णा पोवार यांनी प्रथम गणेश नमन सादर केले. नंतर ‌विद्यार्थ्यांचे सोलो वादन, नवोदित आणि आमंत्रीत बुवाचे गायन वादन झाले. त्यानंतर विद्यार्थ्याने गुरूवर्य रूपेश पोवार यांचे विधिवत पाद्यपुजन करून गुरुवंदन केले. या विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ प्रशांत राऊळ याने यंदा शालांत परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला, त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मळगाव आणि माणगाव विद्यालयातील विद्यार्थ्याचा नादमृदुंगाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचा शेवट सुप्रसिध्द गायक अमित तांबोळकर यांनी अभंग, भैरवी गाऊन केला. त्यांना पखवाज कु. रूपेश पोवार आणि तबलासाथ कु. प्रदिप वाळके यांनी केली. या कार्यक्रमास विजय माधव, सचिन पांगम, संकेत म्हापणकर, अजित पोळजी, कुणाल वारंग आणि पालकांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

You cannot copy content of this page