⚡मालवण ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवार दि.५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. रमण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यालय ओरोस येथे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभात श्री.पी के चौकेकर- सेवानिवृत्त लिपिक, टोपीवाला हायस्कूल मालवण, श्री. सायमन फर्नांडिस- एस एम एस स्कूल कणकवली, श्री. बाबुराव आरोलकर- सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी, शिरोडा हायस्कूल व श्री.लक्ष्मण आत्माराम पंडित – चतुर्थ श्रेणी कर्मचारी, आर.पी.डी. हायस्कूल सावंतवाडी या सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जाधव व सचिव भानुदास परब यांनी केले आहे.
