कार्याध्यक्षपदी विजय चव्हाण
⚡सावंतवाडी ता.०४-: कोलगाव येथील श्री देव वस उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आहे. नव्या कार्यकारीणीत अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते बाबुराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी बबन तानाजी कोलगावकर यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी मधुकर चव्हाण, कार्याध्यक्षपदी विजय चव्हाण, सेक्रेटरी योगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली.
सदर उत्सव समितीकडून श्रावण महिन्यात विविध उत्सव राबविले जातात. श्रावण सोमवारी तसेच श्रावण शनिवारी आरत्या, भजन असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. नवरात्रीलाहीभरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नव्या कार्यकारणीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. श्री देव वस उत्सव समितीच्या माध्यमातून आगामी काळात अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. सामाजिक स्तरातील सर्व बांधवांच्या सुख, समृद्धीसाठी सदैव धार्मिक कार्यक्र मांच्या माध्यमातून देवाला साकडे घालण्यात येणार असल्याचे बाबुराव चव्हाण यांनी सांगितले.
