किल्ले देवगडावर स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम

देवगड (प्रतिनिधी)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देवगड किल्ला येथे स्वराज्य महोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .


त्या निमित्ताने ९ ऑगस्ट २०२२ रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता तहसील कार्यालय ते देवगड किल्ला पदयात्रेचे आयोजन व ठीक ११वाजता देवगड किल्ला येथे राष्ट्रगीताचे समुह गायन , आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देवगड मधील सर्व घटक पहिल्यांदाच या उपक्रमाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत.या साठी प्रशासनाने नियोजन केलेल आहे.लवकरच या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा प्रसिद्ध केली जाईल असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या बाबत नियोजनासाठी विशेष सभा नोडल अधिकारी ,देवगड जामसंडे नगर पंचायत नगराध्यक्ष,सर्व खाते प्रमुख, पोलिस स्टेशन देवगड अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व निमंत्रित यांच्या उपस्थितीत पंचायत समिती देवगड येथील श्री .छ्त्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी तहसील कार्यालय देवगड,पंचायत समिती देवगड चे सर्व विभाग ,देवगड जामसंडे नगर पंचायत,पोलीस स्टेशन देवगड, सन्माननीय लोकप्रतिनिधी ,सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये सर्व विविध संस्था तेथील सर्व कर्मचारी, बार कौन्सिल देवगड ,देवगड जामसंडे नगर पंचायत क्षेत्रातील व जवळच्या क्षेत्रातील सर्व प्राथ./माध्य./उच्च माध्यमिक विद्यालये,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय ,तेथील विध्यार्थी एन सी सी ,एन एस एस युनिट , होमगार्ड, व्यापारी मंडळे/शहर विकास मंडळ/ग्रामस्थ मंडळ/क्रीडा मंडळे/महिला मंडळे/सांस्कृतिक मंडळे /बचत गट ,रोटरी क्लब,पत्रकार संघ, डॉक्टर्स असोसिएशन ,इंजिनिअर्स असोसिएशन,सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक आदी सर्वांना राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार तथा नोडल अधिकारी आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती देवगड तथा सहाय्यक नोडल अधिकारी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page