ग्राहकांच्या अतूट विश्वासामुळे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स हा ब्रँड ग्लोबल

दर्जेदार सेवेसाठी सतत कटिबध्द राहणार;डॉ आनंद पेडणेकर यांनी दिला विश्वास

⚡बांदा ता.०३-: मराठी मातीत निर्माण झालेला जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स हा बाजारात विश्वसनीय मराठी ब्रँड म्हणून नावारूपास आला आहे. केवळ ग्राहकांच्या विश्वासामुळेच व्यावसायिक स्पर्धेत हा ब्रँड ग्लोबल झाला आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी ज्वेलर्सने नावीन्यपूर्ण व लोकांच्या पसंतीस उतरणारे दागिने बाजारात आणले आहेत. स्थानिक ग्राहकांशी नाळ जुळलेला हा ब्रँड नेहमीच आपल्या सेवेसाठी व दर्जेदार उत्पादने देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. असा विश्वास पेडणेकर ज्वेलर्सचे डॉ. आनंद पेडणेकर यांनी येथे व्यक्त केला.


सावंतवाडी वैश्य भवन येथे पेडणेकर ज्वेलर्सच्या ‘राजेशाही संग्रह २०२२’ या कार्यक्रमातून महिला व पुरुषांच्या खिशाला परवडणारे व खास संग्राह्य दागिन्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. पेडणेकर बोलत होते. यावेळी मुंबईतील हिंदी, मराठी सिने कलावंतांनी आकर्षक पदन्यास करत दागिन्यांच्या विविध कलाकुसरीचे व घडणावळींचे सादरीकरण केले. तब्बल ३ तास एक वेगळा सोहळा सावंतवाडीकरांना अनुभवायला मिळाला.


सुरुवातीला कार्यक्रमाचे उदघाटन सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब शुभदादेवी भोसले, मालवण येथील हॉटेल व्यावसायिक संजय गावडे, पेडणेकर ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद पेडणेकर, सौ. आसावरी पेडणेकर, अभिषेक पेडणेकर, सानिका पेडणेकर, सरव्यवस्थापक शैलेश माने, सावंतवाडी शाखेचे व्यवस्थापक अजित खैरे, दैनिक ‘सकाळ’चे पत्रकार निलेश मोरजकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने संपन्न झाले. यावेळी खास महिलांसाठी व तरुण, तरुणीसाठी भारतीय व पाच्छिमात्य असे आकर्षक व नावीन्यपूर्ण दागिने सादर करण्यात आले. सानिका पेडणेकर यांनी ज्वेलर्सच्या नवीन बनविलेल्या वेबसाईटची तसेच वेगवेगळ्या दागिन्यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेत्री पूर्वा भावे हिने केले. यावेळी शेकडो ग्राहक उपस्थित होते.

You cannot copy content of this page