अध्यक्षा विजया बाड, श्रिया नाईक, प्रमोद भागवत, दिलीप म्हापसेकर होते उपस्थित
⚡सावंतवाडी ता.०३-: रोटरी क्लब सावंतवाडी आयोजित वृक्षारोपण आणि वयात येणाऱ्या मुलींसाठी रोटरीच्या अस्मिता प्रोजेक्ट अंतर्गत ओठवणे येथील हायस्कूल आणि पूर्व प्राथमिक शाळा येथे सम्पंन झाला यावेळी रोटरी अध्यक्षा विनया बाड इव्हेंट चेअरमन श्रिया नाईक सचिव प्रमोद भागवत खजिनदार दिलीप म्हापसेकर हे उपस्थित होते.
यावेळी किशोरवयीन मुलींना menstrual Hygeine म्हणजेच पाळीच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि त्यासंधर्भातली स्वच्छता आहार विहार कसा असावा याबद्दल आहारतज्ञ आणि प्रेसिडेंट विनया बाड
यांनी मार्गद्शन केले यावेळी 153 मुलींना pads (बुकलेट्स ) पाळीदरमयान घ्यावयाची माहिती पुस्तिका आणि MV Tabs गरजू मुलींना वाटण्यात आल्या .
तसेच ओतवणे शाळेच्या परिसरात ऐकुन 25 झाडे लावण्यात आली यात जांभूळ,दालचिनी,कोकम,आवळा यासारखी उपयुक्त झाडे लावली यात झाडांचे संवर्धन व्हावे ही मूळ कल्पना असल्याने प्रत्येक मुलांच्या हस्ते ही झाडे लावून त्याची योग्य ती काळजी घेण्याचा कानमंत्र ही दिला.
या कार्यक्रमाला सर्व रोटरी सदस्य नगरपालिका ओतवने शाळेचे मुख्याध्यपक आणि शिक्षक विद्यार्थी रहिवासी श्री वर्णेकर यांची मोलाची मदत झाली त्याबद्दल सचिव भागवत यांनी आभार मानले
