⚡वेंगुर्ला ता.०३-: ज्ञानज्योती सामाजिक सेवाभावी संस्था, सोलापूर या संस्थेचा राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार २०२२ अंतर्गत वायंगणी कोचरेकरवाडीच्या सेवाभावी काम करणा-या शिक्षिका दिप्ती दिपक कोचेरकर यांना आदर्श शिक्षिका प्रेरणा गौरव पुरस्कार कोल्हापूर येथील ताराबाई पार्क जवळील सभागृहात ३१ जुलै रोजी प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी कराड महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. उज्वला पाटील, प्रमुख पाहुणे भारत सरकारच्या महा मेट्रो रेल्वेचे ब्रँड अॅम्बेसिडर व महाराष्ट्र राज्य इंडस्ट्रीज असोसिएशन पुणेचे अध्यक्ष अभयदादा सोपानराव भोर, डॉ.सुरेश कु-हाडे, डॉ.विक्रम शिंगाडे, डॉ.चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.
