रानभाजी पाककला स्पर्धेत पल्लवी चिंदरकर प्रथम

३० स्पर्धकांचा समावेश: बँ नाथ पै सेवांगण कट्टाचे आयोजन

⚡ओरोस ता.०३-: बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी पाक कला स्पर्धा याला मोठा प्रतिसाद लाभला. कट्टा परिसरातील ३० महिलांनी यात सहभाग घेतला होता. यात पल्लवी प्रकाश चिंदरकर या महिलेने बनविलेले पेवग्याच्या भाजीची वडी या पदार्थाने प्रथम क्रमांक मिळविला.
या पाककला स्पर्धेत सहभागी महिलांनी विविध रानभाज्या पासून बनविलेले पदार्थ स्पर्धेला ठेवले होते. यात पेवग्याच्या भाजीची वडी, सुरणाच्या पानाची वडी, भारंगीची भाजी, अळूचे कटलेट, टाकळ्याच्या वड्या, अळूची भजी, चवईच्या फुलाचे कटलेट, कुरडईची भाजी असे विविध पदार्थ महिलानी बनवून आणले होते तसेच प्रत्येक पदार्थाची कृती लिहून आणली होती. यामुळे ही स्पर्धा अधिक रुचकर बनली.
राज्य पुरस्कार प्राप्त आरती वायंगणकर हिने
फोडशीच्या भाज्यांचे थालीपीठ व करटोलीची भजी व सुजाता पावसकर हिने करटोलीचं लोणचं, मिरजीची भाजी काप इत्यादी पदार्थ प्रदर्शनार्थ प्रदर्शनीय म्हणून ठेवली होती. या स्पर्धेचे व प्रदर्शनाचे उद्घाटन आदिती शृंगारे व आरती वायंगणकर यानी केले. आरती वायंगणकर, मधुरा माडये व प्रियांका भोगटे यानी स्पर्धेचे परीक्षण केले. ओम गणेश साई मंगल होलचे मामा माडये मानी आवश्यक टेबल व डेकोरेशन साहित्य पुरवले. या प्रदर्शनाला किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, शशी तांबट, सौ झाटये व परिसरातील महिलानी भेट दिली.
या स्पर्धेत पल्लवी चिंदरकर (पेवाlग्याच्या भाजीची वडी) प्रथम, माधवी वाईरकर (पेवग्याच्या भाजीचे वडे) व दीक्षा रेवडेकर (सुरनांच्या पानांची भाजी) यांनी संयुक्त द्वितीय क्रमांक मिळविला. तर तृतीय साक्षी शंकरदास (टाकळ्याच्या वड्या), गीता नाईक (बांबूच्या कोंबांची भाजी), स्वाती पोखरणकर (चवईच्या फुलांचे कटलेट), समीक्षा हिर्लेकर (चवईच्या फुलांची भाजी) यांनी संयुक्त तृतीय क्रमांक मिळविला. चौथा क्रमांक स्मिता मेस्त्री (घोटवेल भाजी), संज्योत गोसावी (भारंगीची भाजी), सुविधा मलये (अळूची कुरकुरीत भजी), सोनिया हाडये (अळूची भाजी) यांनी संयुक्त मिळविला. तर सुरेखा सावंत, नीलम कदम, सायली नांदोसकर, सुप्रिया ढोलम, उज्वला गुराम, नेहा कदम, विजया वराडकर, वासंती हिर्लेकर, रेश्मा हिर्लेकर, साक्षी देसाई, अर्चना धुत्रे, सानिका गावडे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.

You cannot copy content of this page