बँ नाथ पै सेवांगण येथे मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन सुरू

ओरोस ता.03-:

ता ३
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन करताना वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक यानी गेली २२ वर्ष हा वर्ग सुरु असून १५४ विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळाली आहे. याही वर्षी शिष्यवृत्ती मिळेल अशा विश्वास व्यक्त केला व नेहमी प्रमाणेच याही वर्षी या वर्गाला
सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली.
सलग २२ व्या वर्षी नाथ पै सेवांगण कट्टा येथे मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी दीपक भोगटे, किशोर शिरोडकर, प्रशिक्षण वर्ग प्रमुख बाळकृष्ण नांदोसकर, मार्गदर्शक श्री काळसेकर, सुजाता पावसकर, बाळकृष्ण गोंधळी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी दीपक भोगटे यानी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा मोफत वर्षभर चालणार्‍या या उपक्रमाची विद्यार्थी व पालकाना माहिती दिली. तसेच नियमितपणे अभ्यास करून उज्वल यश मिळवण्याचे आवाहन विद्यार्थ्याना केले. या प्रशिक्षण वर्गाचे प्रमुख बाळकृष्ण नांदोसकर यानी संपूर्ण अभ्यासक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला व पालकाना मौलीक मार्गदर्शन केले. या वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक श्री काळसेकर यानीही मार्गदर्शन केले. शिष्यवृती वर्गासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. गुणानुक्रमे प्रथम ३० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. हा वर्ग पूर्णपणे मोफत असून अनेक शिक्षक विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत. हा वर्ग २२ वर्ष सातत्याने सुरु असून या वर्षीही हा वर्ग शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी सुरु राहाणार आहे.

You cannot copy content of this page