५ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ओरोस येथे सत्कार

⚡ओरोस ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट, २०२२ रोजी १२ वाजता जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यालय ओरोस येथे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे .
यावेळी पी के चौकेकर, सेवानिवृत्त लिपिक, टोपीवाला हायस्कूल मालवण, सायमन फर्नांडिस , एस एम एस स्कूल कणकवली, बाबुराव आरोलकर सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी, शिरोडा हायस्कूल व लक्ष्मण आत्माराम पंडित, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, आर पी डी हायस्कूल सावंतवाडी हे शिक्षकेतर कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सदरच्या कार्यक्रमासाठी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जाधव व सचिव भानुदास परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page