⚡कणकवली ता.०३-:
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडल शाखा – कणकवली यांच्या वतीने तेली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व समाजात उल्लेखनीय कार्य करणार्या समाज बांधवांचा सत्कार सोहळा मंगळवार १६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता तेली समाज जिल्हा कार्यालय कणकवली तेलीआळी येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी कणकवली तालुक्यातील सन २०२२ मध्ये इयत्ता १० वी. ७५ %, इयत्ता १२ वी. ७०%, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा उत्तीर्ण तसेच शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण, जिल्हा स्तरावर प्राविण्य मिळविल्या विद्यार्थ्यांनी आपली नावे व प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत खाली दिलेल्या संपर्क प्रमुख यांच्याकडे दिनांक ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत शैलेंद्र डिचोलकर (मो. नं. ९४२२४३६०४४), दत्ताराम हिंदळेकर (मो. नं. ९४२३२७६२६५), अरविंद वायंगणकर (मो. नं. ९०११२८७०८७) द्यावीत.
तरी या विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाला कणकवली तालुक्यातील तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली तालुका तेली समाजाचे तालुकाध्यक्ष दत्ताराम हिंदळेकर व सचिव अरविंद वायंगणकर यांनी केले आहे.
