Headlines

वक्तृत्व स्पर्धेत उर्वी देसाई आणि आदेश खानोलकर प्रथम

⚡दोडामार्ग ता.०३-: नूतन विद्यालय कळणे प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी झाली.यावेळी लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त प्रशालेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा निकाल

पुढीलप्रमाणे:-
लहान गट (इ. 5 वी ते 7 वी)-
कु. उर्वी संदेश देसाई –प्रथम
कु. श्रुती चंद्रशेखर कळणेकर –द्वितीय

मोठा गट (इ. 8 वी ते 10 वी) –
कु. आदेश हिराकांत खानोलकर –प्रथम
कु. समृद्धि संजय देसाई–द्वितीय
कु. तेजल अनिल देसाई–तृतीय
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून संस्थापदाधिकारी सन्माननीय आनंद देसाई, प्रशालेचे मुख्याध्यापक महेंद्र देसाई तसेच प्रशालीतील सर्व शिक्षकवृन्द उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील सहाय्यक शिक्षक उमेश देसाई यांनी लोकमान्य टिळकांची जीवनगाथा विस्तृतपणे मांडली. परीक्षक म्हणून सहशिक्षिका निकिता सावंत व अच्युत गावड़े यांनी काम पहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश देसाई यांनी तर आभार निकिता सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page