⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी बाजारपेठेतील श्रीमती स्नेहलता मधुकर कुलकर्णी (वय ७८) यांचे २ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे , एक मुलगी, सुना , जावय, नातवंडे , दोन भाऊ असा परिवार आहे.
ओंकार मेडिकल स्टोअरचे मालक राजेश कुलकर्णी व आपले सरकार महाईसेवा केंद्रचे मालक मंगेश कुलकर्णी यांच्या त्या आई होत.कणकवली येथील डाॅ.अनंत नागवेकर , कनेडी बाजारपेठेतील डाॅ. साईनाथ नागवेकर यांच्या त्या भगिनी होत. माध्यमिक विद्या मंदिर कनेडी प्रशालेच्या माजी शिक्षिका म्हणून चांगली कामगिरी आपल्या कार्यकाल सेवेत केली होती. उत्तम शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या.
सांगवे कनेडी बाजारपेठेतील
स्नेहलता कुलकर्णी यांचे निधन
