कणकवली तालुक्यातील सर्पमित्रांचा
ओसरगाव तलावाच्या काठावर सत्कार

⚡कणकवली ता.०२-:
नागपंचमी सणाचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील सर्पमित्रांचा ओसरगाव तलावाच्या काठावर गावाच्यावतीने सत्कार कणकवलीचे तहसीलदार श्री आर. जे. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते, ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे,सुनील साटम , वाय.जी .राणे, हेमंत आंगणे ,पोलीस पाटील सौ .संजना आंगणे ,हेमंत तांबे, सुदर्शन नाईक, सौ. चंदना राणे, चिनार राणे उपस्थित होते तसेच ओसरगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्पमित्र तन्मय आंगणे, अंकुर जाधव,यदनेश खरात,मयुरेश केळुसकर,सुमित वारंग, प्रतिक सावंत,ओंकार सावंत,संकेत सावंत,यश वर्दम, पार्थ सावंत,चैतन्य निगरे यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे कार्यक्रम दरम्यान बोर्डवे गावात साप पकडणारे तन्मय अंगणे व मयुरेश केळुसकर यांनी साप पकडण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यावेळी तहसीलदार आर.जे. पवार यांना दाखविले.
स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःची पदर मोड करून हे सर्पमित्र आपली ओळख निर्माण करतात व समाजाला मदत करतात अशा जिगरबाज सर्पमित्रांचा छोटे खाणी सत्कार करण्यात आला. शासनाची सर्पमित्रांना मदत होईल का यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.याप्रसंगी सर्पमित्रानी सापांना कसे हाताळायचे ,सापांचे जतन संवर्धन प्रचार आणि प्रसार कसा करावयाचा, सापांचे नैसर्गिक अधिवासात असलेले स्थान यासंदर्भात सर्पमित्र यांनी मार्गदर्शन केले. अचानक आपल्या आजूबाजूच्या परिसरात साप आला तर आपली धांदल उडते अशाप्रसंगी सर्पमित्रांची ओळख तालुक्यात जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न ओसरगाव गावाच्या वतीने करण्यात आला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते, ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page