तळवडे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

⚡बांदा ता.०२-: इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे येथे थोर समाज सुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर उपस्थित होते. प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात केली. सर्व मुलांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांची माहिती दिली.

त्यांचा जन्म, बालपण, शिक्षण आणि त्यांचे समाजकार्य यांचा उलगडा भाषणातून केला. तसेच याच दिनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला, त्यांच्या समाजकार्याला आणि त्यांच्या साहित्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यास प्रशालेचे सहशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. प्रशालेच्या संचालिका सौ मैथिली नाईक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page