चोरटा सीसीटिव्हीत कैद: मालक संतोष तळवणेकर यांची पोलिसात तक्रार
सावंतवाडी : भर वस्तीत चार नं. शाळे शेजारील न्यू-सबनीसवाडा येथील ओम साई इंटरप्राईझेस, सानिया इन्व्हर्टर या दुकाना बाहेर ठेवलेल्या सुमारे ३८ हजार रुपयांच्या ३ बॅटऱ्या अज्ञात चोरट्यानं लंपास केल्यात. काल मध्यरात्रीच्या ही घटना घडली असून चोरटा सीसीटीव्ही कैद झाला असुन मालक संतोष तळवणेकर यांनी पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
दुकानाबाहेर ठेवलेल्या बॅटऱ्या न आढळल्यान संतोष तळवणेकर यांनी सीसीटीव्ही तपासले असता एक व्यक्ती चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. तासाभराच्या फरकाने दोन वेळा येऊन बॅटऱ्यांची चोरी करण्यात आली. चोरीला गेलेल्या बॅटऱ्यांमध्ये १७ हजार, ९ हजार व १२ हजार रकमेचा बॅटऱ्यांचा सामावेश आहे. संतोष तळवणेकर यांनी पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली असून भर वस्तीत शिरून चोरी करणाऱ्या या चोरट्याचा तातडीने शोध घेत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
