⚡सावंतवाडी ता.०२सहदेव राऊळ-: निरवडे ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी मधुकर घाडी यांच्या सेवानिवृत्त निमित्त त्यांचा निरवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
निरवडे ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी मधुकर घाडी यांच्या सेवानिवृत्त निमित्त सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निरवडे सरपंच हरी वारंग, उप सरपंच चंद्रकांत गावडे, माजी सरपंच सदा गावडे माजी सरपंच प्रमोद गावडे, ग्रामस्थ धर्माजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर, शिल्पा सावळ, सुरेखा बोंद्रे, संदीप पांढरे, सुप्रिया निरवडेकर, बाईत मॅडम, सुविधा गावडे, संतोष गावडे, माजी ग्रामविस्तार अधिकारी संजय गावडे, मधुसुदन गावडे, नागेश गावडे, पोलीस पाटील अजित वैद्य, एकेरी येथील अशोक शिवलकर, मळगांव ग्रामस्थ गुरुनाथ गावकर आदी उपस्थित होते. यावेळी मधुकर घाडी यांना निरोप देण्याबरोबरच त्यांना विविध भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच घाडी यांची पत्नी श्वेता मधुकर घाडी व मुलगा-मुलगी यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच हरी वारंग यांनी घाडी यांचे योगदान निरवडे गाव कायम ध्यानात ठेवेल. तसेच घाडी यांचे निरवडे गाव जिल्हा स्तरीय स्पर्धेत येण्यासाठी मोठे योगदान असल्याचे सांगितले. घाडी यांनी आपल्या सत्कार व सन्मान केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन आजगावकर सर यांनी केले.
