काजूचे दुकान फोडत ६० हजाराचे काजूगर केले लंपास

अज्ञात चोरट्याचा डल्ला: बांदा सरपंच अक्रम खान यांचे सावधान राहण्याचे आवाहन

बांदा /प्रतिनिधी
बांदा शहरात महामार्गावार असलेल्या रॉयल कॅश्यू चे दुकान अज्ञात चोरट्यानी फोडून आतील सुमारे ६० हजार रुपये किमतीचे ५० किलो काजुगर लंपास केलेत. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. सरपंच अक्रम खान यांनी याठिकाणी येत पाहणी करत शहरातील जनतेला चोरट्यापासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांदा पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्राथमिक चौकशी केली. मात्र दुकान मालकाने तक्रार करण्यास नकार दिल्याने या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही.

You cannot copy content of this page