Headlines

कट्टा सेवांगण येथे मोफत शिवण प्रशिक्षण

⚡मालवण ता.०२-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या कट्टा शाखेतर्फे नारायण शिवराम पाताडे आणि सुनीता नारायण पाताडे यांच्या स्मृतिनिमित्त येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे महिला सबलीकरण मोफत शिवण प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे.

नवीन शिवणवर्गासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांनी १० ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी सुजाता पावसकर (८३५६०९९१७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page