आंबोली आगार व्यवस्थापक यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी
आंबोली,ता.१९ : येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वस्तीची बस सुरू करण्यात यावी यासाठीचे निवेदन सावंतवाडी आगार चे आंबोली व्यवस्थापक श्री.एस.डी.प्रभू यांच्याकडे ग्रामस्थ तथा शिवसेना विभाग अध्यक्ष बबन गावडे,ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,पत्रकार अनिल चव्हाण,विजय राऊत,रमेश मोहिते,सुरेश नाटलेकर,सुशील तावडे,प्रवीण भिसे,परेश कर्पे, ऋतुज गावडे यांनी दिले.
यावेळी व्यवस्थापक श्री.प्रभू यांनी निवेदन वरिष्ठांकडे देऊन लवकरच बस सुरू करण्यात येईल असे सांगितले.
