देवगड जामसंडे युवा सेना शहर प्रमुख पदी तेजस मामघाडी,..

शहर समनवयक पदी सौरभ माने यांची नियुक्ती

⚡देवगड ता.१९-: तालुक्यातील युवा सेनाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येऊन देवगड- जामसंडे युवा सेना शहरप्रमुख पदी नगरसेवक तेजस मामघाडी, शहरप्रमुख पदावरून शहर समन्वयक पदी सौरभ माने
मिठबाव विभागप्रमुख पदी दत्तप्रसाद उर्फ तुषार धुरी याना उपविभागप्रमुख पदावरून बढती देण्यात आली असून
शिरगाव विभागप्रमुख पदी सागर गोरुले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती युवा सेना तालुका प्रमुख निनाद देशपांडे यांनी दिली.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,यांनी नियुक्तीचे पत्र पदाधिकारी याना सादर करण्यात आले आहे.या वेळीशिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, युवासेना तालुकाप्रमुख निनाद देशपांडे, युवासेना विभागप्रमुख गणेश वाळके, फरीद काझी, युवासेनेचे गणेश गावकर, सिद्धेश माणगावकर, युवासेना शाखाप्रमुख हितेश खवळे, मुकेश मयेकर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page