केसरकराना आता राणेंचा दहशतवाद दिसणार नाही, ते जुळवून घेणार

केवळ मंत्रिपदासाठी शिंदे गटात ते गेले;जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा केसरकरांवर घणाघाती आरोप

⚡सावंतवाडी ता.१९-: दीपक केसरकर हे शिंदे गटात फक्त मंत्रिपदासाठी गेले आहेत. ते गेल्याने सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना दीपक केसरकर मुक्त झाले आहेत. त्यानी आजपर्यंत कधीही कार्यकर्त्यांनची कदर केली नाही. किंवा संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे उगाच मी शिवसेनेत आहे असे सांगून शिवसैनिकांची दिशाभूल करू नये, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.केसरकर यांच्याकडे आता केवळ दोन वर्ष राहिली असून, ती उपभोगावी असा सल्ला दिला आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले की, विधानसभा जिंकण्यासाठी राणेंच्या दहशतवादाचा मुद्दा पुढे करून जनतेला फसविणाऱ्या केसरकर यांना आता राणेंचा दहशतवाद दिसत नसून, त्यांच्याशी ते जुळवून घ्यायला तयार आहेत. आमदार दीपक केसरकर यांनी केवळ खोटे बोलून रोजगाराच्या मुद्द्यावर येथील युवकांची दिशाभूल केली आहे. त्यांना फसवले आहे. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

You cannot copy content of this page